धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या संशयावरून एका तरुणास मारहाण केल्याने त्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मोबाईल चोरीच्या संशयावरुन काही तरुणांनी अमर लोमटे ( वय 27) तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. अत्यंत निर्दयीपणे मारहाण केल्याने अमर याचा मृत्यू झाला असून ढोकी पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना ढोकी येथील तेरणा साखर कारखान्या जवळ घडली असून पोलीसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटने बद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
अमर लोमटे या तरुणावर मोबाईल चोरीचा संशय घेत त्यास ऊसाने,काठीने बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनविण्यात आला. अमरचे वडील राजेंद्र लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ बबलु दत्ता इंगळे, संतोष दादाराव वाघमारे, अकबर शेख, शंकर चौधरी यांच्यासह अन्य लोकांवर कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे हे करीत आहेत. पोलीसांनी काही आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध असल्याची पोलीसांनी माहिती दिली.