धाराशिव – धाराशिव येथील पत्रकार विशाल अशोक जगदाळे यांना जिल्हा परिषद समोर धमकी देण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध आनंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नवनाथ मडके हा संभाजी विद्यालय मंगरुळ येथे क्लार्क असून त्याने संभाजी विद्यालय मंगरुळ या संस्थेचे अध्यक्ष अच्युत पाटील व संस्थेचे सचिव रामेश्वर वाघमारे यांच्या सांगण्यावरून पत्रकार विशाल जगदाळे यांना दि. 08/07/2024 रोजी तू संभाजी विद्यालय मंगरुळ या शाळेविषयी माहिती चा अधिकार का टाकला? व माहिती का मागवत आहे? तू जर माहिती मागवण्याचा प्रयत्न केला तर तुला अच्युत पाटील व रामेश्वर वाघमारे जीवे मारतील असा दम दिला. हा सगळा प्रकार जिल्हा परिषद धाराशिव च्या समोर झाला असून पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल. पत्रकाराला दिवसा ढवळ्या धमकी दिल्याने पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून आरोपी वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी होत आहे