बार्शी – मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील युवक शंभुभक्त प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे सेवेकरी म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली होती.
लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.