धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पुढाऱ्यांची दडपशाही एकदा समोर आली आहे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेशाची परवानगी दिली असताना देखील 18 जुलै च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आल्याने बैठकीत शिजणारी गुपितं जनतेसमोर येऊ नये यासाठीच केलेला अट्टाहास असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे बैठकीत काय शिजलं? काय भिजलं? हे जनतेसमोर येईल कसं हा प्रश्न यानिमित्ताने सर्व सामान्य जनते समोर निर्माण झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर मागील बैठकीच्या वेळी पत्रकारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला होता. याची दखल घेत पुढच्या बैठकीत बसण्याची परवानगी देण्यात आली होती, त्या संदर्भात पत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांच्या वतीने पालकमंत्री यांचं अभिनंदन देखील करण्यात आलं होतं मात्र 18 जुलै च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने सत्ताधारी व विरोधकांची मिली भगत असल्याची चर्चा जोर धरू लागली असून बैठकीत “मिल बाट के खायेंगे” असं तर होत नाही ना? अशी चर्चा सामान्य जनतेत जोर धरू लागली आहे.