धाराशिव जिल्ह्यातील खळबळजनक घटना
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अशातच तुळजापूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना घडल्याची नोंद झाली आहे.
किराणा दुकानात कुरकुरे घेण्यासाठी आलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील एका गावात (नाव गोपनीय) घडली आहे. सदर, घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ९ वर्षीय चिमुकलीवर १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली आहे. पिडीत चिमुकली ही कुरकुरे घेण्यासाठी घराबाहेर पडली होती, यावेळी नराधमाने तिला घरात बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला तरुणाने अत्याच्यारानंतर सदर घटनेची बाहेर वाच्यता करू नको असे म्हणत तीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. सदरील पिडीत चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील अधिकचा तपास सुरू आहे.