तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, अल्पवयीन आरोपीला अटक
धाराशिव – बदलापूरची घटना ताजी असतानाच अशीच दुर्दैवी धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे या घटनेमुळे जिल्हा हळहळला आहे.
तीन वर्षाची चिमुकली नेहमीप्रमाणे आपल्या घराशेजारील घरात खेळायला गेले असता तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात घडली आहे. अल्पवयीन आरोपीला लोहारा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी तात्काळ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तीन वर्षे मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घरा जवळ खेळत असताना शेजारी राहत असलेला तेरा वर्षाचा मुलगा याने सदरील चिमुकलीला आपल्या घरी घेऊन गेला त्याचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता तर आई-वडील पुण्याला गेले होते याचा गैरफायदा घेऊन या अल्पवयीन मुलाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला सदर प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ लोहारा पोलीस स्टेशन गाठले आणि लोहारा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पोलीस निरीक्षक अजित चिंतले उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांनी तात्काळ पावले उचलत सदरील अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या मुलाविरोधात लोहारा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून. भा. न्या. सं. कलम 64(१)65(२) सह कलम 4,6 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने हे करत असून सदरील आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला ज्वेलनाईल कोर्टासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.