महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार संत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
विस्तारात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
नेहमी वादग्रस्त वक्तव्ये आणि विविध कारणांमुळे चर्चेत असलेले हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे देखील मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे
मंत्रिमंडळाच्या ‘रेस’मध्ये बांगर यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे विस्तारात भरत गोगावले की संजय शिरसाट यांनी संधी मिळेल हे लवकरच कळेल
मंत्रिपदासाठी ही नावे चर्चेत?
महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसांत होणार आहे. यामध्ये भाजपकडून गणेश नाईक (ऐरोली), नितेश राणे (कणकवली), माधुरी मिसाळ (पर्वती), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निंलगा), सुरेश धस (विधानपरिषद) या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
शिवसेना शिंदे गटातून संजय शिरसाट (संभाजीनगर), आशिष जयस्वाल (रामटेक), भरत गोगावले (महाड) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.
अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप (नगर) आणि अण्णा बनसोडे (पिंपरी ) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.