राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
मुंबई – एका कौटुंबिक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एका फ्रेममध्ये दिसून आले. आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. मात्र, यावर शर्मिला ठाकरे यांनी भाष्य करत अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेहमी राजकीय टोलेबाजी सुरू असते. मात्र, दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत “आदित्य असं काही करेल असं वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आदित्यची पाठराखण केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल शर्मिला ठाकरेंचे आभार मानले होते.
यानंतर एका घरगुती कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पण यावर आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अगदी मोजक्या शब्दात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे ?
राज आणि उद्धव हे एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील सर्वजण एकत्र आले होते. माझी नणंद राजकारणात नाही, तसेच राज ठाकरे जसे तिचे भाऊ आहेत, तसं उद्धव ठाकरे देखील भाऊ आहेत”, असं त्या म्हणाल्या. तसेच याचवेळी त्यांना ठाकरे बंधू एकत्र येणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना “बघुया…”, असे सूचक विधान शर्मिला ठाकरे यांनी केले.