धाराशिव – विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. काही जणांनी आधीपासूनच तयारी सुरू केली असून मतदारांच्या गाटी-भेटीवर जोर देऊ लागले आहेत तर काही जणांनी बॅनर बाजी करत आपणच उमेदवार असणार अश्याप्रकरे तोरा मिरवायला सुरुवात केली आहे.

धाराशिव कळंब मतदार संघातून महाविकास आघाडी कडून कैलास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर एकीकडे महायुती कडून अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही मात्र इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली असून “मीच होणार आमदार” असे म्हणत आमदारकीच्या तिकिटावर एकप्रकारे आपली दावेदारी असणार हे अप्रत्यक्षपणे जाहीर करू लागले आहेत.

अश्यातच आता चर्चा रंगली आहे ती शिंदेंच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्ट्स ची. साळुंके यांच्या समर्थकांनी फेसबुक वर लागा तयारीला, उमेदवार फिक्स, आमदार फिक्स “वन साईड – सुरज राजाभाऊ साळुंके” अश्या स्वरूपाच्या पोस्ट करत राजकीय वातावरण रंगवून टाकले आहे. यामुळे धाराशिव-कळंब शिवसेनेकडून सुरज साळुंके यांना आमदारकीचे तिकीट मिळणार अशी आशा कार्यकर्त्यांना लागली आसून कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर जोमाने कामाला लागले आहेत.