धाराशिव – विधानसभा निवडणूक जस-जशी जवळ येईल तस-तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. धाराशिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य असलेले सुधीर पाटील यांनी मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग यत आहे, निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जाण्यासाठी तसेच आपल्याला विधानसभेला संधी मिळावी यासाठी मुंबईत ठाण मांडून बसल्याची तर काहींच्या गुप्त गाठीभेटी होत असल्याची चर्चा सुरू आहे. अशताच धाराशिव मधील भाजपच्या सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने राजकीय हालचालीस वेग आल्याचे चित्र आहे.

1988 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून 1989 साली धाराशिव मधून विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, शिवसेना पक्षात 3 वर्ष जिल्हाप्रमुख पदावर राहिलेल्या सुधीर पाटील यांनी पक्षांतर्गत कुरघोडीवर भाजप मध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे परत एकदा त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.