भूम – शिवसेना पक्षप्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे व धाराशिव विद्यमान खासदार ओमराजे निंबळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या बद्दल पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूम येथे जामावबदी अदेश लागु असताना तानाजी सावंत यांच्या विरोधी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली एकत्र आल्याने जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्यामुळे ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबधी समस देऊन सोडण्यात आले आहे
दिनांक १२ रोजी मुख्य गोलाई चौक या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या फोटोला चपलाने मारून त्यांचे विरुद्ध घोषणाबाजी करून करत होते, मी तेथे हजर असणारे लोक कोण आहेत हे पाहिले सदरील अंदोलक यांनी कुठलीही परवानगी अगर निवेदन दिले नसल्याचे सांगीतले. सर्व अंदोलक यांनी कुठलेही निवेदन अगर पूर्व कल्पना न देता मा. जिल्हाधिकारी सो धाराशिव यांचे जमावबंदी जा.क्र.2024/उपचिटणीस/एमएजी-3/कावी-128 दि. 14/2/2024 या आदेशाचे उल्लंघन करुन शासकिय आदेशाची पायमल्ली केली असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाक्षाचे ॲड श्रीनिवास जाधवर रा.सोनगिरी शिवसेना भुम तालुका प्रमुख ,चेतन बोराडे रा. पाथरुड उपजिल्हा प्रमूख, , प्रल्हाद आडगळे रा. पाटसांगवी विधानसभा सभा प्रमुख युवासेना, दिलीप शाळू रा. भुम शिवसेना विधानसभा समन्वयक, संग्राम लोखंडे रा. भुम, शंकर गपाट रा. भुम युवसेना उपलुका प्रमुख, रोहीणी गपाट रा. भुम, सुधीर ढगे रा. चिंचपूर ढगे युवासेना तालुका प्रमूख, अजित तांबे रा. देवळाली युवासेना तालुका संघटक, श्रिमंत भड़के रा. सुकटा उपतालुका प्रमुख, ताई लांडे रा, भुम, जिन्नत सय्यद रा. बेलगाव महिला आघाडी जिल्हा प्रमुख, मिनाताई कोकणे, विहंग कदम रा. भुम, अनिल शेंडगे रा. भुम माजी तालुका प्रमुख , विनायक नाईकवाडी रा. भुम समन्वयक, वंदना साठे रा. भुम दिपक मुळे रा. भूम राजाभाऊ नलावडे रा.लांजेश्वर उपतालुका प्रमुख व इतर पाच ते सहा यांचेवर भादवी कलम 188 सह 135 मपोका प्रमाणे पो .संदेश पंडीत क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारणाचा विचार केला तर आज पर्यंत चा इतिहास आहे इलेक्शन संपले कि विरोधी सगळे नेते कार्यकर्ते चहा पाणी एकत्र करायचे परंतु आता मात्र हुकूमशाही आणि पैसाच्या जोरावर प्रत्येकाची हऱ्यास्मेंट करून दबावाचे राजकारण सुरु केले आहे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले तरी तानाजी सावंत यांनी पोलिस्टेशन ला दबाव अणून महिलांवर व आमच्या वर गुन्हे दाखल केले आहेत आम्ही उद्धव ठाकरे चे शिवसैनिक आहोत आशा गुन्ह्याला आम्ही घाबरत नाहीत याचा जनताच बिस्मोड करेल
– प्रल्हाद आडागळे विधानसभा प्रमूख युवासेना भूम परांडा वाशी