शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची माहीती
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने चुकीचे भारांकन लावून शेतकऱ्यांना निम्मीच भरपाई दिली होती.ही चूक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तेव्हाच निदर्शनास आणून दिली होती.यावर जिल्हा ते राज्य स्तरावरील तक्रार निवारण समित्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत उर्वरित २९४ कोटी रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले.मात्र कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत होती.3 जानेवारी रोजी आमदार पाटील यांनी कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी भेटून कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी केली.जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती.याचा परिणाम म्हणून कंपनीने भरपाई देण्याचे मान्य केले.२३२ कोटी रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होत आहेत.हप्त्याचे ५० कोटी रुपये शासनाकडे शिल्लक आहेत. तर उर्वरित ९२ कोटी रुपये हाती असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळू लागली आहे.शेतकरी एकजुटीचा,लढ्याचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.