वाशी – जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचा जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू असताना वाशीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्या दोन मराठा आयोजकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
1)संदीपान नामदेवराव कोकाटे, 2) आप्पासाहेब देशमुख दोघे रा. ईट, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.11.2023 रोजी 22.00 ते 23.05 वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचा जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागु असताना मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण संदर्भाने सभा आयोजीत केली.
दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालु ठेवून आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दादाराव शिवाजी औसरे, वय 33 वर्षे, पोलीस अमंलदार/144 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.19.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.