नागरिकांनी काळजी घ्यावी जिल्हाधिकारी डा सचिन ओम्बासे यांचे आवाहन
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असुन JN1 व्हेरीयंट चा 1 रुग्ण आढळून आला आहे.
तुळजापूर तालुक्यात हा रुग्ण सापडला असून जवळगा मेसाई या गावातील हा रुग्ण आहे. रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन सज्ज झाले असुन नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
14 वर्षीय हा रुग्ण हिप्परगा येथील शाळेत असुन गेल्या 3 दिवसांपासून त्या रुग्णाला ताप होता. त्यानंतर त्याला खोकला सुरु झाल्याने तपासणी करण्यात आली असता त्याला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. या मुलाची आई गेल्या 10 दिवसांपूर्वी मुंबई येथून आली होती आईला कोणतीही लक्षणे सध्या नाहीत, कोरोनाच्या JN1 चा शिरकाव झाला आहे. या मुलाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी दिली असून मुलाची तब्येत बरी असल्याची माहिती दिली. JN1 हा नवीन व्हेरियंट कोरोनाच्या तुलनेत जास्त घातकी नसला तरी त्याचा प्रसार मात्र वेगाने आहे.