वाशी – तेरखेडा येथे भारत मातेच्या सेवेत सदैव समर्पित राहिलेले आपल्या देशाचे पुर्वपंतप्रधान भारतरत्न श्रध्येय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच देशभरात होत असलेल्या नमो चषक स्पर्धांसाठी नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला.
यावेळी परांडा विधानसभा विस्तारक शिवाजीराव गिट्टे, भाजपा वाशी तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे यांच्यासह प्रविण घुले, नानासाहेब खोत, शहाजी तोरडमल, मनोज जोशी, वैभव भोसले, स्वप्नील ऊमरदंड, विश्वनाथ जगदाळे, संजय नेमाने, सुहास चौगुले, मकरंद गोळे, रोहन गपाट, यांच्यासह तेरखेडा जिल्हापरिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते.